नव कृष्णा व्हॅली स्कूल मधील रिदिमा मराठे व अन्वी कुलकर्णीला बॅडमिंटन स्पर्धेत रौप्य पदक
Miraj, Sangli | Sep 26, 2024 सीबीएससी दिल्ली बोर्ड अंतर्गत क्लस्टर नाईन बॅडमिंटन स्पर्धा भिवंडीत आयोजित करण्यात आल्या होत्या सदर स्पर्धेत महाराष्ट्र आणि गोवा राज्यामधील 40 शाळांमधील अडीच हजार खेळाडू सहभागी झाले होते यामध्ये मुलींच्या सतरा वर्षाखालील गटात रिधिमा मराठे आणि अन्वी कुलकर्णी यांनी सर्व खेळाडूंना नमून रौप्य पदक प्राप्त केले आहे .मागील वर्षीही त्यांनी शालेय बॅडमिंटन राज्यस्तरीय स्पर्धेत घवघवीत प्राविण्य मिळवलं होतं .त्या सध्या धीरज कुमार यांच्याकडे बॅडमिंटनचे धडे घेत आहेत .त्यांना अध्यक्ष प्रवीण शेठ लोणकर सचिव यांची कामत डायरेक्टर संगीता पागनीस चेअरमन यशवंत तोरो उपप्राचार्य प्रशांत चव्हाण स्पोर्ट्स इन्चार्ज विनायक जोशी क्रीडा शिक्षक सुशांत सूर्यवंशी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले .