ज्ञान प्रबोधिनी, शैक्षणिक उपक्रम संशोधिका, पुणे, श्री विवेकानंद रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, रोहा यांच्या वतीने श्री.विवेकानंद रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट रोहा येथे मंगळवारी 24 जून रोजी दहावी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला.या कार्यक्रमात ज्ञान प्रबोधिनी, शैक्षणिक उपक्रम संशोधिका यांचे माध्यमातून रोहा तालुक्यातील १८ शाळेत दहावी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव मान्यवरांचे हस्ते करण्यात आला.