नागपूर शहर: धक्कादायक! नागपुरात महागड्या कारमधून गोवंशाची तस्करी; कळमना परिसरातील थरार सीसीटीव्हीमध्ये कैद
उपराजधानीत गुन्हेगारांचे मनोबल किती वाढले आहे, याचे जिवंत उदाहरण कळमना पोलीस स्टेशनच्या हद्दीत पाहायला मिळाले आहे. एका पांढऱ्या रंगाच्या महागड्या लक्झरी कारमधून गोवंशाची दिवसाढवळ्या तस्करी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले असून परिसरात संतापाची लाट उसळली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, कळमना परिसरातील एका गजबजलेल्या वस्तीत ही घटना घडली.