पुर्णा: पूर्णा शहरातील टिळक रोडवरील सायकल दुकानाला आग लागली, कारण अज्ञात
रविवार 8 नोव्हेंबर रोजी पूर्णा शहरातील टिळक रोडवर शिवम स्वामी यांच्या सायकल दुकानाला अचानक आग लागली. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस तपास करत आहेत. अग्निशमन दल घटनास्थळी उपस्थित असून आग विझवण्याचे काम सुरू आहे.