नाशिक: शहरात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने बनवणाऱ्या पाच जणांना उपनगर पोलिसांनी केली अटक; नाशिकरोड भागात काढली धिंड
Nashik, Nashik | Oct 14, 2025 सोशल मीडियावर रिल्स बनवून व्हायरल करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या जेलरोड परिसरातील कॅनल रोड आम्रपाली झोपडपट्टी भागात राहणाऱ्या पाच जणांना उपनगर पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांची धिंड काढण्यात आली.आरोपींनी नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला अशा घोषणा दिल्या.उपनगर पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे रिल्स बनवून दहशत निर्माण करून आपले साम्राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी चांगला धडा शिकवला आहे.