नागपूर शहर: फेसबुक वरील मैत्री महिलेला पडली महागात, लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार
नागपूरमध्ये लग्नाचे आमिष दाखवून ३६ वर्षीय महिलेवर वारंवार अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.आरोपी शुभम प्रफुल जैस्वाल सीताबर्डी परिसरातील बारमध्ये वेटर म्हणून काम करणारा याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे पीडित महिलेचा विवाह २००८ मध्ये झाला होता आणि २०२२ मध्ये पतीचे निधन झाल्यानंतर ती आईच्या घरी राहत होती. याच काळात फेसबुकच्या माध्यमातून तिची आरोपीशी ओळख झाली होती