भोकरदन: वडोदा तांगडा येथे जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा व चाऱ्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता
आज दिनांक 10 ऑक्टोंबर 2026 वार शनिवार रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील वडोद तांगडा येथे शेती शिवारात व गाव परिसरामध्ये शेतकऱ्यांच्या जनावरांचा पिण्याच्या पाण्याचा व चाऱ्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता वर्तवली आहे,कारण यावर्षी पाऊस झाला नाही त्यामुळे नदी नाले विहीर कोरड्या ठक्क पडत चालले आहे ,त्या कारणास्तव सरकार तात्काळ योग्य तो निर्णय घेऊन जनावरांच्या चाऱ्याचा व पाण्याचा प्रश्न तात्काळ मिटवावा अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.