नागपूर शहर: : नागपुरात घरफोडी करणाऱ्या दोघांना गिट्टीखदान पोलिसांकडून अटक;लाखोचा मुद्देमाल जप्त
गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घरफोडीच्या एका गंभीर गुन्ह्याचा तपास करत पोलिसांनी दोन आरोपींना गजाआड केले आहे. या कारवाईत पोलिसांनी चोरीला गेलेल्या ऐवजापैकी पावणेदोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. असलम अझर काझी आणि तेजस धीरज लोणारे या दोघांना ताब्यात घेतले.