विनापरवानगी मटक्याच्या जुगार अड्ड्यावर सोमवारी (३०) दुपारी ४ वाजता छापा मारून पोलिसांनी संतोष कारभारी पवार (वय ४६, रा, गंगापूर) यास ताब्यात घेतले. त्याच्या जवळून ४१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी आरोपीविरोधात रात्री १० वाजता गंगापूर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोह. पाटील हे करीत आहेत.