परतूर: कोरेगाव शिवारात वादळी वाऱ्याने व पावसाने केळी बागेच नुकसान,पिक विमा कंपनीचे बघायची भूमिका,शेतकऱ्यांमध्ये संताप
Partur, Jalna | May 29, 2026 आज दिनांक 29 मे 2026 वार शुक्रवार रोजी सायंकाळी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार परतुर तालुक्यातील कोरेगाव येथे शेत शिवारात 3 दिवसापूर्वी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला या पावसामुळे वादळी वाऱ्याने शेकडो हेक्टर वर शेतकऱ्यांनी पेरलेल्या केळी बागेची आपणास नुकसान झाले यावर स्थानिक लोकप्रतिनिधींनी आवाज उठवतात पिक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी थातूरमातूर पाहणी केली,मात्र ठोस अशी आर्थिक मदत मिळवण्याची घोषणा या शेतकऱ्यांना त्यांनी केलेली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप पाहायला मिळत आहे.