श्रीवर्धन: श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यावर भुत काढण्याच्या’ बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार
अंधश्रद्धेचा आधार घेत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार श्रीवर्धन तालुक्यात उघडकीस आला आहे. 22 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजता आरोपीने भुत काढून देतो असा बहाणा करून पीडित मुलगी व तिच्या आईला चारचाकी वाहनात बसवले आणि त्यांना श्रीवर्धन समुद्रकिनारी घेऊन गेला.घटनास्थळी पोहोचल्यावर आरोपीने पीडितेच्या आईला समुद्रकिनारी दूर बसायला सांगितले.त्यानंतर परिस्थितीचा गैरफायदा घेत आरोपीने अल्पवयीन मुलीला एकांतस्थळी नेऊन तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक अत्याचार केल्याचे उघड झाले आह