अंबड: जालना जिल्ह्यातील शेवगा येथे हनुमान यात्रेनिमित्त भव्य कुस्ती दंगल संपन्न
Ambad, Jalna | Apr 18, 2026 *जालना जिल्ह्यातील शेवगा येथे हनुमान यात्रेनिमित्त भव्य कुस्ती दंगल संपन्न* शेवगा — जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील शेवगा येथे आज दिनांक 18 एप्रिल रोजी हनुमान यात्रेनिमित्त भव्य कुस्ती दंगल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या दंगल स्पर्धेला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. समस्त गावकरी मंडळी, शेवगा (ता. अंबड) यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाचे आयोजन मारुती मंदिर परिसरात करण्यात आले होते. दुपारपासून सुरू झालेल्या कुस्ती सामन्यांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले