वर्धा शहरातील रामनगर वासियांचा मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला लीजचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे.पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे, रामनगर येथील लीजची जमीन फ्री होल्ड करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. असल्याचे आज चार नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात कळविले आहे