नागपूर शहर: महसूल मंत्री बावनकुळेंच्या 'खासगी' भेटीने राजकीय वातावरण तापले; गिट्टी खदान परिसरात काँग्रेसचा तीव्र निषेध
महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत सध्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असतानाच, राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या एका भेटीमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. गिट्टी खदान परिसरातील एका खासगी भेटीला काँग्रेसने जोरदार विरोध दर्शवल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गिट्टी खदान परिसरातील राजू देवगडे यांच्या निवासस्थानी वैयक्तिक भेट दिली.