नाशिक: तपोवन रोडवरील लक्ष्मीनारायण मंदिरासमोर अपघातात एकाचा मृत्यू; आडगाव पोलीस ठाण्यात नोंद
Nashik, Nashik | Oct 18, 2025 तपोवन रोडवरील लक्ष्मीनारायण मंदिरासमोर रस्ताच्या दुभाजकास दुचाकी घासून पोलला धडकून एकाचा मृत्यू झाल्याची घटना असून आडगाव पोलीस ठाण्यात आकस्मत मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.दीपक रघुनाथ चौधरी वय 39 राहणार निळकंठ अपार्टमेंट काठेगल्ली, तपोवन रोडने त्यांच्या दुचाकीवर जात असताना स्वामीनारायण मंदिर समोर, उपचंद्र सोसायटी येथे दुभाजकास दुचाकी घासून ते इलेक्ट्रिक पोलला धडकले.या अपघातात त्यांच्या चेहऱ्याला डोक्याला गंभीर दुखापती झाल्यने औषध उपचार म्हणतात यांचा मृत्यू झाला.