परतूर: प्रल्हादपूर राजपूत वाडी येथे असलेल्या ऐतिहासिक बारवाची दुरावस्था, संबंधित विभागाचे दुर्लक्ष
Partur, Jalna | Jul 6, 2026 आज दिनांक 6जुलै 2026 वार सोमवार रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास परतूर तालुक्यात प्रल्हादपूर राजपूत वाडी येथे असलेल्या पुरातन ऐतिहासिक बारवीची दुरावस्था झाल्याचे पाहायला मिळाले आहे, हा बारव म्हणजे कचरा साठवणुकीचा डेपो तयार झाला असून सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरली आहे यामुळे इतिहास प्रेमी मध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी या सर्व बाबीकडे वेळीच लक्ष देऊन स्वच्छता राबवावी व दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे.