बोदवड: येवती येथे उसने पैसे परत मागितल्याच्या कारणावरून तरुणाला सहा जणांची मारहाण, बोदवड पोलिसांत गुन्हा दाखल
बोदवड तालुक्यात येवती हे गाव आहे. या गावात अमोल बावस्कर वय ३५ या तरुणाने उधार दिलेले पन्नास हजार रुपये परत मागितले या कारणावरून त्याला ज्ञानेश्वर पाटील, सुनीता पाटील,मंगला पाटील, कमलाबाई पाटील, निवृत्ती पाटील व निवृत्ती पाटील ची मुलं यांनी मारहाण केली. तेव्हा याप्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे