बसमत: औंढा ते वसमत च्या दिशेने दुचाकीवरून येणाऱ्या दोन इसमाचा उघडी नदीच्या पुलावर अज्ञात वाहनाच्या धडकेत उपचार दरम्यान मृत्यू
वसमत शहरालगत असलेल्या उघडी नदी जवळ 8 ऑक्टोबर रोजी रात्री आठ ते नऊ या दरम्यान मध्ये एम एच 38 T 38 71 या दुचाकीवरून औंढा ते वसमत येत असताना शहरालगत असलेल्या उघडी नदीच्या पुलावर अज्ञात वाहनाच्या धडकेमध्ये जबर अपघात झाला आणि अपघातात उपचार दरम्यान दोन युवकांचा मृत्यू झाला .अपघात झालेले दोन्ही युवक वसमतच्या एका बँकेत नोकरी करत असल्याची माहिती प्राप्त झाली असून एक युवक आसेगाव येथील आहे आता कोणत्या वाहनांनी अपघात झाला याचा शोध मात्र पोलीस घेत आहेत .