पोलिसांवरील हल्ल्याची हॅट्ट्रिक, हद्दपार आरोपीसह चौघे अटकेत
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Feb 28, 2026
आज दि 28 फेब्रुवारी सकाळी 11 वाजता छत्रपती संभाजीनगर शहरात पोलिसांवर हल्ल्यांची मालिका सुरूच असून आमेन चौक, भावसिंगपुरा येथे विशेष पथकावर हल्ल्याची तिसरी घटना घडली. हद्दपार आरोपी ईश्वर राजू चव्हाण याने ताब्यात घेत असताना हवालदारावर लोखंडी सुरीने वार करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. आरोपीच्या साथीदारांनीही हुज्जत घालत शासकीय कामात अडथळा निर्माण केला. या प्रकरणी एका महिलेसह चौघांना अटक करण्यात आली. छावणी पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल असून पुढील तपास सुरू