परतूर: गोळेगाव येथे गोदावरी नदी पात्रात बोट बुडाली 40 प्रवासी बुडाल्याची प्राथमिक माहिती तर 2महिलांचा मृत्यू
Partur, Jalna | Jun 10, 2026 आज दिनांक 10 जून 2026 वार बुधवार रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास जालना जिल्ह्यातील परतुर तालुक्यातील गोळेगाव येथून वाहणाऱ्या गोदावरी नदीपात्रामध्ये 40 प्रवासी घेऊन जाणारी प्रवासी बोट बुडाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून यामध्ये 2महिलांचा मृत्यू झाल्याचे सुद्धा समोर आले आहे त्या घटनेची माहिती परिसरातील नागरिकांना होतात त्यावेळी अग्निशमन दल पोलीस दल व हजारो नागरिकांनी इतर प्रवाशांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू केले असून बचाव कार्य सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे.