मुंबईत उद्या रेल्वेचा तिन्ही मार्गावर मेगा ब्लॉक
मुंबईत उद्या रविवार दिनांक १० फेब्रुवारी रोजी रेल्वेच्या मध्य, पश्चिम व हार्बर या तिन्ही मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे माटुंगा ते ठाणे आणि पनवेल ते वाशीदरम्यान मध्य रेल्वेने उद्या, रविवारी मेगाब्लॉक घोषित केला आहे. पश्चिम रेल्वेवर सांताक्रूझ ते गोरेगावदरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द होणार असून काही लोकल फेऱ्या २० मिनिटे विलंबाने धावणार आहेत.