परतूर: मलंग शहा चौकात असलेला हाय मॅक्स लाईटचा पोल ठरत आहे वाहतुकीस अडथळा
Partur, Jalna | May 20, 2026 आज दिनांक 20 मे 2024 वार बुधवार रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास परतूर शहरात असलेल्या मुलांची हा चौकामध्ये नगरपंचायत कार्यालय व महावितरण कंपनी कार्यालय यांच्या वतीने काही महिन्यापूर्वी नागरिकांना अंधारापासून संरक्षण व्हावे व प्रकाश यावा या हेतूने हायमॅक्स लाईटचा पोल उभारून त्यावर लाईट लावण्यात आली मात्र हा लाईटचा पोल वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून याला तात्काळ काढावे अशी मागणी नागरिकांतून होत आहे.