सेलू तालुक्यातील कूपटा व निपानी टाकळी शेत शिवारात बिबट्या सदृश प्राणी दिसल्याचा व्हिडिओ आज रविवार 14 डिसेंबर रोजी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमुळे परिसरात कुशंकांना उधाण आले असून, वन विभागाने तात्काळ बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.