परतूर: नेर येथे आपर तहसील कार्यालय व्हावे या मागणीसाठी परतूर मतदारसंघातील हजारो नागरिक जिल्हाधिकारी कार्यालयावर
Partur, Jalna | Apr 28, 2026 आज दिनांक 28 एप्रिल 2026 वार मंगळवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास परतुर विधानसभा मतदारसंघातील हजारो शेतकऱ्यांनी व नागरिकांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता यामध्ये त्यांची मागणी होती की नेर येथे अप्पर तहसील कार्यालय व्हाव, कारण अप्पर तहसील कार्यालय नेर येथे झाले तर शेतकऱ्याच व परतुर मतदारसंघातील नागरिकांच्या अडीअडचणी सुटतील, शेतकऱ्यांची कामे तात्काळ होतील,यासाठी या शेतकऱ्यांनी एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली आहे.