सांगलीकरांचे जीवनमान उंचावण्यासाठी "संवाद सांगलीसाठी"-- पृथ्वीराज पाटील
Miraj, Sangli | Sep 26, 2024 सांगलीकर हे शहराचे कान आणि डोळे आहेत त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांना काय हवं काय नको यासाठी त्यांनी बोलायचं आम्ही ऐकायचं आणि त्यांच्याकडून प्राप्त सूचना एकत्रित करून भविष्यातील चांगल्या सांगलीसाठी संवाद सांगलीसाठी हा उपक्रम हाती घेतल्याचे प्रतिपादन पृथ्वीराज पाटील यांनी व्यक्त केले आहे .इंजिनीअर्स अँड आर्किटेक्ट असोसिएशनच्या सभागृहात आयोजित संवाद सांगलीसाठी या उपक्रमात नागरिकांशी संवाद साधताना ते बोलत होते