परतूर: डोलारा व आंबा परिसरात नदी पात्रातून वाळूचा मोठ्या प्रमाणात सुरू, महसूल विभागाचे दुर्लक्ष
Partur, Jalna | Jun 11, 2026 आज दिनांक 11 जून 2026 वार गुरुवार रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास परतूर तालुक्यातील डोलारा व आंबा परिसरात असलेल्या नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टरच्या माध्यमातून विनापरवाना वाळू उपसा सुरू असल्याचे पाहायला मिळाले आहे मात्र या सर्व बाबीकडे महसूल विभाग व पोलीस विभागाची दुर्लक्ष होत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात हा वाळू उपसा होत आहे,तरी होणारी वाळू उपसा तात्काळ थांबवावा अशी मागणी सध्या दबक्या आवाजात गाव परिसरातून नागरिकांमधून होत आहे.