परतूर: नळाला पाणी नाही आले तर सरपंचांच्या घरावर मोर्चा व ग्रामपंचायत पुढे उपोषण करा आ.बबनराव लोणीकर यांचा वाटुर येथे इशारा
Partur, Jalna | Apr 10, 2026 आज दिनांक 10 एप्रिल 2020 वार शुक्रवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास परतूर तालुक्यातील वाटूर येथे परतूरचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार बबनराव लोणीकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमांमध्ये बोलताना पाणी प्रश्नावर आ.लोणीकर यांनी म्हटले आहे की नळाला पाणी आले नाही तर सरपंचाच्या घरावर मोर्चा व ग्रामपंचायत समोर महिला मंडळांनी लाडक्या बहिणींनी उपोषण करावे असा इशारा यावेळी त्यांनी दिला आहे.