जिल्ह्यामध्ये शिक्षण आणि आरोग्य विभागाचा एकत्रित प्रयत्न
गोंदियात सिकलसेल जनजागृती अभियान
3.4k views | Gondia, Maharashtra | Feb 10, 2026 जिल्हा परिषद गोंदियाचे शिक्षणाधिकारी संदेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सिकलसेल अॅनिमिया या आजारावरील जनजागृती मोहिमेला प्रोत्साहन मिळाले आहे. हा मोहिमेचा एक भाग म्हणून जाधव यांनी प्रसिद्धीकरण केले. ज्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये सिकलसेल अॅनिमियाबद्दल जागरूकता निर्माण होण्यास मदत होईल. जिल्ह्यातील सिकलसेल अॅनिमिया या आजाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आणि नागरिकांमध्ये विज्ञानाधिष्ठित दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागामार्फत 'अरुणोदय' सिकलसेल अॅनिमिया विशेष अभियान युद्धपातळीवर राबविले जात आहे.