नागपूर ग्रामीण: राहुल गांधींचे आंदोलन देशाला बदनाम करण्याचा सुनियोजित कट - परिणय फुके
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशाबाहेर किंवा देशात घेतलेले आंदोलन हे भारताची प्रतिमा मलीन करण्यासाठी आणि विदेशी गुंतवणूक रोखण्यासाठी एका 'सुपारी'नुसार केले जात असल्याचा गंभीर आरोप भाजप नेते परिणय फुके यांनी नागपुरात केला आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी राहुल गांधी यांच्या भूमिकेवर कडक शब्दांत ताशेरे ओढले.