अंबरनाथ: अंबरनाथमध्ये बारवी धरणाची मुख्य जलवाहिनी फुटली, पाणीपुरवठ्यावर परिणाम शक्यता
अंबरनाथमधील फॉरेस्ट नाका परिसरात बारवी धरणाची जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. यामुळे अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली, ठाणे आणि MIDC भागांतील पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे.