रामटेक: दुर्गम किरंगी सर्रा येथील महिलांना मशरूम उत्पादनाच्या माध्यमातून वनविभागाने दिला स्वयं रोजगार
Ramtek, Nagpur | Mar 30, 2026 रामटेक तालुक्यांतर्गत येणाऱ्या चोरबाहुली वनपरिक्षेत्रात अगदी कोअर क्षेत्रातील शेवटच्या दुर्गम किरंगी सर्रा गावातील महिला पुरुषांना जंगलात जाऊन आपला उदरनिर्वाह करण्यापेक्षा घरीच रोजगार उपलब्ध व्हावा या दृष्टीने त्यांचे व्याघ्र प्रकल्पांतर्गत चोरबावली वनपरिक्षेत्राधिकारी जयेश तायडे यांच्या प्रयत्नाने मशरूम उत्पादन व पॅकिंग करून चोरबाहुली प्रवेश द्वारा वर पर्यटकांना मशरूम विक्री करून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.