कोंढवा कौसर बागमध्ये महापालिकेचा बुलडोजर! अतिक्रमणावर मोठी कारवाई; व्यावसायिकांचा तीव्र विरोध
पुणे | कोंढवा : कोंढव्यातील कौसर बाग परिसरात महापालिकेने अतिक्रमणाविरोधात मोठी कारवाई केली आहे. या कारवाईदरम्यान काही व्यावसायिकांनी स्वतःहून अनधिकृत बांधकाम व साहित्य हटवले, तर काही ठिकाणी महापालिकेच्या पथकाकडून बुलडोजरच्या सहाय्याने कारवाई करण्यात आली.
महापालिकेच्या कारवाईला काही व्यावसायिकांनी तीव्र विरोध केल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
दरम्यान, अतिक्रमणाविरोधात कारवाई झाली असली तरी रस्ता नागरिकांसाठी पूर्णपणे कधी खुला होणार? असा प्रश्न स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
अतिक्रमण हटवल्यानंतर रस्त्याची रुंदी, वाहतूक व्यवस्था आणि नागरिकांना होणारा त्रास याबाबत महापालिका पुढील काळात काय पावले उचलणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
🚨 कौसर बागमध्ये महाप�