पालघर: मनोर ते शिर्डी पायी पालखी सोहळा, साईबाबांची पालखी आज सकाळी शिर्डीकडे मार्गस्थ.
दरवर्षीप्रमाणे यंदाही भक्तीमय वातावरणात भाविक शिर्डीला निघाले आहेत. आज 16 जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता मनोर मधून शिर्डी ला जाण्यासाठी पालखी मार्गस्थ झाली संपूर्ण भक्तीमय वातावरणात साईनामाच्या गजरात ही पालखी सकाळी दहा वाजता मनोर मधून निघाली यंदा या पालखीचे पंधरा व वर्ष असून पालखी पायी शिर्डी प्रवास करणार आहे.