धुळे: निमडाळे गाव शिवारात दोन विद्यार्थ्यांचा तलावत बुडून मृत्यू
Dhule, Dhule | Aug 23, 2024 धुळे तालुक्यातील निमडाळे गावात झालेल्या दुर्दैवी घटनेत दोन शाळकरी विद्यार्थ्यांचा तलावामध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे गावात मोठ्या प्रमाणात शोकाकाळ पसरली आहे. मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांची नावे हितेश सूर्यवंशी आणि मयूर खोंडे अशी आहेत. दोन्ही विद्यार्थी निमडाळे गावातील जयहिंद हायस्कूलमध्ये शिकत होते.