ई चलन तक्रारीपैकी 59 टक्के तक्रारी फेटाळण्यात आल्या - अनिल गलगली
आज दिनांक 21 मे 2025 वेळ सायंकाळी चार वाजताच्या सुमारास माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी दिली असून ‘वन स्टेट वन चलन’ या डिजिटल पोर्टलच्या माध्यमातून मुंबई वाहतूक पोलीस विभागाने १ जानेवारी २०२४ ते २८ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत एकूण १,८१६१३ ई-चलन विरोधात ऑनलाईन तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी १,०७८५० तक्रारी फेटाळण्यात आल्या आहेत. म्हणजेच, जवळपास ५९% तक्रारी अमान्य ठरल्या असे माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली म्हणाले.