भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील आयुध निर्माणी शेजारील हतनूर-टहाकळी मार्गालगत प्रस्तावित राज्य राखीव पोलिस बल (एसआरपीएफ) प्रशिक्षण केंद्राच्या उभारणीस लवकरच गती मिळण्याची चिन्हं दिसत आहेत.राज्याचे वस्त्रोद्योगमंत्री तथा भुसावळचे स्थानिक आमदार संजय सावकारे यांनी या ठिकाणी भेट देऊन संपूर्ण स्थळाची पाहणी करून अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली.