नागपूर शहर: अबब! नागपुरात बुटात लपला साप, रेस्क्यू करून टळला अनर्थ
पावसाळ्यात साप निघण्याच्या अनेक घटना घडत असतात अशातच ते कोणत्याही ठिकाणी लपून बसलेले असतात. आपण पायात घालायला बूट घेतला आणि त्यामध्येच चक्क साप निघाला तर... नागपूरमधील सुरेंद्रगड परिसरात एका कुटुंबाच्या घरी धक्कादायक प्रकार घडला. सकाळी बूट घालण्यासाठी हात घातला असता, त्यात साप लपून बसल्याचे आढळले. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली होती.