कारंजा: कारंजा लाडमधील भ. महावीर गार्डन विकास कामांना 1 कोटीचा निधी मंजूर
कारंजा लाड येथील भ. महावीर गार्डनच्या उर्वरित विकासासाठी 1 कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. दिगंबर जैन महासमितीच्या मागणीवरून आणि शिवसेना नेत्या भावनाताई गवळी यांच्या सहकार्याने काम सुरू झाले असून लवकरच गार्डन पूर्ण विकसित होणार आहे.