नाशिक: अंबड भागातील गरवारे पॉईंट किया शोरूम च्या समोर अपघातात एकाचा मृत्यू
Nashik, Nashik | Oct 15, 2025 अंबड भागातील गरवारे पॉईंट किया शोरूम च्या समोर अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची घटना 14 ऑक्टोबर रोजी घडली असून दुपारी दीड वाजता अंबड पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. 15 ऑक्टोबर रोजी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भिका सखाराम जाधव राहणार सिडको कॉलनी हे त्यांच्या बुलेट मोटरसायकलवर गरवारे पॉईंट येथून जात असताना किया शोरूमच्या समोर एका टेम्पोने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांचा जागेवर मृत्यू झाला. या प्रकरणी पोलीस हवालदार झोले पुढील तपास करीत आहे.