पालघर: राष्ट्रीय महामार्गावर जव्हार फाटा परिसरात बर्निंग कंटेनरचा थरार
मुंबई- आमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर बर्निंग कंटेनरचा थरार पहावयास मिळाला आहे. राष्ट्रीय महामार्गावर जव्हार फाटा परिसरात एका कंटेनरच्या मागच्या बाजूस अचानक आग लागली. ही बाब निदर्शनास आल्यानंतर कंटेनर चालकाने कंटेनर रस्त्याच्या कडेला उभा केला. त्यानंतर इतर वाहनचालक, स्थानिकांच्या मदतीने पाण्याचा मारा करून कंटेनरच्या मागच्या बाजूला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. सुदैवाने आगीवर वेळीच नियंत्रण मिळवल्याने मोठी दुर्घटना टाळली आहे.