पालघर: आमदार विलास तर यांच्या हस्ते डोंगरी- मनोर येथे व्यायाम साहित्याचे उद्घाटन
पालघर तालुक्यातील डोंगरी- मनोर येथे व्यायाम साहित्य पंचायत समिती माजी सभापती रंजना म्हसकर घोलप यांच्या प्रयत्नात उपलब्ध करून देण्यात आले आहे. या व्यायाम साहित्याचे उद्घाटन बोईसरचे आमदार विलास तरे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण, रंजना म्हसकर घोलप, गणेश घोलप, ग्रामपंचायत उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी, शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते, तरुण, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.