तळेगाव पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दिनांक तीन तारखेला पावणेचार च्या दरम्यान तळेगाव पोलिसांनी मौजा कोपरा शेत शिवारातील स्मशानभूमी कडील डोबा जवळ धाड टाकून सात ड्रम मधील 200 लिटर कच्चा मोह रसायन सडवा आणि इतर साहित्य असा एकूण जुमला किंमत दोन लाख 17 हजार रुपयांच्या मुद्देमाल जप्त केला आहे पवन नरेंद्र पाटील राहणार कोपरा पुनर्वसन तालुका आर्वी जिल्हा वर्धा यांच्या विरोधात तळेगाव पोलिसांनी अपराध क्रमांक 571/2025 कलम 65 एक महाराष्ट्र दारूबंदीकायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे..