आरमोरी: भरधाव ट्रकची दोन दूचाकीना धडक, दोन्ही दूचाकी चालक गंभीर जखमी,ठाणेगांव गाढवी नदी जवळील घटणा
काल भरधाव ट्रकने धडक दिल्याने काटली जवळ रस्त्यावर व्यायाम करणार्या ४ चिमूकले मूलांचा मृत्यु झाल्याची घटणा ताजी असतानाच याच आरमोरी - गडचिरोली मार्गावर गाढवी नदी ठाणेगांव च्या वळणावर अद्यात ट्रकने दोन दूचाकीना धडक दिल्याने दोन्ही दूचाकी चालक गंभीर जखमी झाल्याची घटणा आज दि.८ आगस्ट शूक्रवार रोजी सांयकाळी ७.३० वाजेचा सूमारास घडली.अपघातात रामेश्वर जिवन नैताम रा.ठाणेगांव व मच्छिंन्द्र सहारे रा.देऊळगांव हे गंभीर जखमी झाले आहेत त्याना उपचारा करीता उपजिल्हा रूग्णालय आरमोरी येथे दाखल करण्यात आले