सेलू: दिग्रज येथे जुन्या कौटुंबिक वादातून इवायाने ईनीवर केला प्राणघातक हल्ला, सिंदी पोलिसांत एकाविरुद्ध गुन्हा नोंद
Seloo, Wardha | Oct 17, 2024 जुन्या कौटुंबिक वादातून इवायाने ईनीवर प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना मंगळवारी दिनांक 15 रोजी सकाळी 9 वाजता तालुक्यातील दिग्रज येथे घडली. रीना मनोज दांडेकर वय 40 वर्ष राहणार दिग्रज असे जखमी झालेल्या महिलेचे नाव असून बबन मोतीराम कामडी वय 57 वर्ष रा. दिग्रज असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी तक्रारीवरून रात्री 9 वाजता पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. अशी माहिती ता. 17 गुरुवारी सिंदी पोलिसांनी दिली.