अलिबाग: रायगड जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच; आंबा नदीने इशारा पातळी ओलांडली
Alibag, Raigad | Jul 2, 2026 रायगड जिल्ह्यात पावासाचा जोर मागील चार दिवसांपासून कायम आहे. जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाची संततधार कायम आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. जिल्ह्यातील प्रमुख नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून, आंबा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. हवामान विभागाकडून जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.