गोरेगावः महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत, प्राथमिक आरोग्य केंद्र कावळेवाडा अंतर्गत असलेल्या आयुष्मान आरोग्य मंदिर चिचगावच्या वतीने चिचगाव टोला येथे विशेष आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये प्रामुख्याने सिकल सेल, असंसर्गजन्य रोग आणि कुष्ठरोग तपासणीवर भर देण्यात आला. ग्रामस्थांच्या सोयीसाठी एकाच छताखाली विविध महत्त्वाच्या चाचण्या मोफत करण्यात आल्या.