तुमसर तालुक्यातील गोबरवाही पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या चिखला (ता. तुमसर) येथे अवैध मोहफुलाची दारू गाळली जात असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी धडक कारवाई करत आरोपी हिवराज श्रीराम कापगते (वय ४२ वर्ष, रा. चिखला) याला रंगेहाथ पकडले. या कारवाईत पोलिसांनी ३६,००० रुपये किमतीचा ३६० किलो सडवा मोहफूल साठा, १५ लिटर हातभट्टीची दारू, जर्मन कर्ची, मातीची हंडी, मडके, रबरी ट्यूब, प्लास्टिक पाईप आणि जळाऊ लाकडे असा एकूण ३९,९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, आरोपीविरुद्ध गोबरवाही पोलीस..