पुणे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी आता परदेशी भाषा शिकण्याची नवी संधी! 🇩🇪🇫🇷🇪🇸🇷🇺🇯🇵
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमांतर्गत यंदा २१८ शिक्षकांना जर्मन, फ्रेंच, स्पॅनिश, रशियन आणि जपानी भाषांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
हे प्रशिक्षित शिक्षक आपल्या शाळांमधील विद्यार्थ्यांना परदेशी भाषांचे प्राथमिक ज्ञान देणार आहेत. गेल्या वर्षी १०२ शिक्षकांनी तब्बल ५,१०० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले होते.
विद्यार्थ्यांना लहान वयातच परदेशी भाषांचे ज्ञान मिळाल्याने भविष्यात शिक्षण, आयात-निर्यात आणि विविध आंतरराष्ट्रीय करिअरच्या संधींचे मार्ग खुले होऊ शकतात.
पुणे ZPचा हा प्रयोग आता राज्यभर राबविला जाणार का? याकडे लक्ष लागले आहे.
#PuneNews #PuneZP #MaharashtraNews #EducationNews #ForeignLanguage
Pune City, Pune | Sep 29, 2026