नागपूर शहर: धार्मिक भीती दाखवून ८१ वर्षीय महिलेची ३ लाखांची फसवणूक : जयवंत पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक
इमामवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयवंत पाटील यांनी 10 जुलैला सकाळी 11 वाजता दिलेल्या माहितीनुसार इमामवाडा पोलीस ठाण्यांतर्गत रामबाग कॉलनीत एका ८१ वर्षीय वृद्ध महिलेला धार्मिक संकट आणि पूजेचे आमिष दाखवून अज्ञात ठगांनी ३ लाख ५ हजार रुपयांचे दागिने व मोबाईल लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली. सुजाता अग्रवाल या मंदिरातून परतत असताना आरोपींनी त्यांना गाठले आणि संकट टळण्यासाठी दागिने व मोबाईल एका पिशवीत ठेवून पूजेसाठी मागून घेतले. मात्र, पिशवी ताब्यात घेताच आरोपींनी पोबारा केल