समुद्रपूर: मांडगाव येथिल व्यायाम शाळेचे बांधकामाची चौकशी करा:हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाची खासदाराकडे मागणी
मांडगाव येथिल व्यायाम शाळेचे बांधकामाची चौकशी करण्याची मागणी येथिल हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ मांडगाव ,युवा संघ, भिकाराम महाराज सेवा मंडळाच्या वतीने २२ जुन रोजी १ वाजता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात खासदार अमर काळे यांना निवेदन देण्यात आले.या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की मांडगाव येथे माजी खासदार यांच्या निधी मधुन व्यायाम शाळेचे काम गेल्या तिन महिण्यापासुन सुरू आहे त्या कामामध्ये फारच दिरंगाई होत आहे तरी सदर कामाची चौकशी करावी.